Posts

लॉकडाऊन मधील कार्य

Image
        आज लॉकडाऊनला जवळपास 4 महिने पूर्ण झाले या चार महिन्याच्या कालावधीत 25 मार्च  पासून ते आजपर्यंत  कोविड या आजाराची सतत जाणवलेली भीती आणि यादरम्यान केलेले कार्य यावर लिहावे असे माझ्या मनात आले आणि म्हणूनच आता आजच्या ब्लॉग ने त्याची सुरुवात करत आहे .मित्रानो , मनुष्य हा समाजशील प्राणी आहे हे समाजशास्त्रा मधे  महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना प्रथमतः समजले पण प्रत्यक्षात त्यांची अनुभूती लॉकडाऊन काळात अनुभवास आली.आपण समाजाशिवाय फार काळ आनंदाने  राहू शकत नाही हे जेव्हा पहिल्या 15 दिवसात कळायला सुरवात झाले  तेव्हा मी गेल्या 10 वर्षात  स्वकष्टाने विकत घेतलेल्या 15 एकर शेतजमीन कडे माझे लक्ष वळवले.सतत कोरोनाचा विचार न करता योग्य ती खबरदारी घेऊन घरातूनच कामात  व्यस्त राहायचे ठरवले.                      लॉकडाउन च्या अगोदरच्या काळात  आठवड्यातून 4 दिवस मुंबई येथे मंत्रालयीन कामकाज पाहणे हे माझे गेल्या 14 वर्षाचे नियमित वेळापत्रक प्रथमतच बिघडले आणि पुणे येथे गेली 4 महिने घरातच थांबून आद्यवत तंत्राचा वापर करून सतत पाठपुरावा करून शेती मधे 18 एकर पेरू,  सीताफळ,  केशर आंबा , शेवगा, लिंब