लॉकडाऊन मधील कार्य
आज लॉकडाऊनला जवळपास 4 महिने पूर्ण झाले या चार महिन्याच्या कालावधीत 25 मार्च पासून ते आजपर्यंत कोविड या आजाराची सतत जाणवलेली भीती आणि यादरम्यान केलेले कार्य यावर लिहावे असे माझ्या मनात आले आणि म्हणूनच आता आजच्या ब्लॉग ने त्याची सुरुवात करत आहे .मित्रानो , मनुष्य हा समाजशील प्राणी आहे हे समाजशास्त्रा मधे महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना प्रथमतः समजले पण प्रत्यक्षात त्यांची अनुभूती लॉकडाऊन काळात अनुभवास आली.आपण समाजाशिवाय फार काळ आनंदाने राहू शकत नाही हे जेव्हा पहिल्या 15 दिवसात कळायला सुरवात झाले तेव्हा मी गेल्या 10 वर्षात स्वकष्टाने विकत घेतलेल्या 15 एकर शेतजमीन कडे माझे लक्ष वळवले.सतत कोरोनाचा विचार न करता योग्य ती खबरदारी घेऊन घरातूनच कामात व्यस्त राहायचे ठरवले.
लॉकडाउन च्या अगोदरच्या काळात आठवड्यातून 4 दिवस मुंबई येथे मंत्रालयीन कामकाज पाहणे हे माझे गेल्या 14 वर्षाचे नियमित वेळापत्रक प्रथमतच बिघडले आणि पुणे येथे गेली 4 महिने घरातच थांबून आद्यवत तंत्राचा वापर करून सतत पाठपुरावा करून शेती मधे 18 एकर पेरू, सीताफळ, केशर आंबा , शेवगा, लिंबू आणि रामफळ , चिकू बाग यशस्वी पणे लाऊन घेतली.याच कालावधीत शेतात दगडी विहीर बांधून घेतली व शाश्वत शेती साठी पाण्याची सोय केली .दरम्यानच्या चार महिन्याचा काळात माझ्याकडुन एकूण जवळपास 500 च्या वर शेतातील कामे करण्याऱ्यांना काम दिले गेले याचे आज जुलै महिन्यात समाधान वाटत आहे .आपल्या कार्याने समाजाचा फायदा व्हावा हे लक्ष डोळ्यापुढे ठेऊन कामास सुरवात केली आणि मनात बाळगलेले स्वप्न प्रत्यक्षात उतरवले.
आज शेतात लावलेल्या सर्व प्रकारच्या फळाच्या झाडाची एकूण संख्या 18 हजाराच्या जवळपास आहे , ही सर्व झाडे जून मधे भरपूर पाऊस पडल्याने आता हिरवीगार दिसू लागली आहेत. आता राज्यात काही भागात अनलॉकला सुरवात झाल्याने 15 दिवसातून एकदा तरी मी नियमाच्या अधीन राहून पोलिस प्रशासनाकडून प्रवास पास घेऊन पुणे सोलापूर प्रवास स्वतः च्या कारने करतो व राहिलेली शेतातील कामे पूर्ण करून घेत आहे.मोबाईल मधील व्हटसअप, यूटुब , वीडियो कॉल चा पुरेपूर उपयोग करून मला हे करता आले याचा आवर्जून उल्लेख मला याठिकाणी कारावसा वाटतो.
मित्रानो , कोणतेही कार्य पूर्ण करायचे असेल तर पहिल्यादा सुरवात करा आपोआप परीस्तीथी बदलत राहते आणि आपणास हवे तसेच निसर्ग घडवतो , सुरवात करणे हे सर्वात महत्त्वाचे कार्य आहे. कार्य कोणतेही असू देत शाररिक शक्ती पेक्षा डोक्यात शक्ती आणली की ते आपोआप पूर्ण होते हे मी आपणासमोर अनुभवातून मांडत आहे.पुढील वर्षी पेरूच्या व शेवग्याच्या झाडाला चांगले फळ लागेल आणि भरपूर उत्तपन मिळेल अशी खात्री आहे. धन्यवाद जयहिंद
तुमच्या कार्याचे फळ तुम्हाला मिळणारच... आम्हालाही फळं चाखायला द्या😄
ReplyDeleteहोय , नक्की
Deleteशिवारातील सोन......खूपच सुंदर
ReplyDeleteThanks
DeleteMastch sir
ReplyDeleteplz mention your name after comment .thanks to all
ReplyDeleteसतत कार्यमग्न ही प्रवृत्ती फार कमी लोकांच्या जवळ आढळते. त्यातून ते जे साकारतात ते दोन रूपात समोर येते. एक स्व विकास आणि समाजपुरुष चा उत्कर्ष. हे दोघे कार्य आपल्या या कार्यातून साकारत ही सदिच्छा. जागतिक आरोग्य आपत्ती च्या काळात सर्व लोकं नकारात्मक विचाराच्या छायेत चाचपळत असतांना ही 'जिजीविषु वृत्ती' च मानवाला वाचवू शकते. त्या वृत्तीस शतशः प्रणाम. आम्हाला तुमच्या या शिवारास भेट द्यायला नक्की आवडेल.
ReplyDeleteआपला
प्रा. ज के चित्ते